मित्रहो आज मी तुम्हाला अतिशय उपयुक्त वल्लभगड.कोम या www.vallabhgad.com वेबसाईट बद्दल सांगणार आहे. वल्लभगड बेळगाव जिल्हा अमर जवन वेबसाईट पुन्हा नव्या जोमाने आणि नव्या रंगामध्ये सुरु झाली आहे.
‘राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा…’ असं बेळगाव भूमीचं वर्णन केलं जातं. आकाशाला गवसणी घालणारे बेळगाव सीमाभागातील पर्वतमाथे, डोंगर-सुळके, उरात धडकी भरविणा-या खोल-खोल द-या, उभे तुटलेले ताशीव, अक्राळविक्राळ… गोकाक धबधबा, वनसंपदा, ऋतूमानाप्रमाणे रंग-रूप धारण करणारा इथला निसर्ग… वर्षाऋतूत सिमाभागाच्या कुशीत थबथबणारा अनोखा जलोत्सव…टपो-या थेंबांनी कोसळणारा पाऊस.. आवेगाने झेपावणारे सहस्रावधी जलधारांचे चंदेरी प्रपात… उताराच्या दिशेने खळाळत जाणारे ओढ्या-नाल्यांचे अगणित प्रवाह… दुथडी भरून वाहणा-या नद्या… उनाड रानवारा…सृष्टीच्या कानात कुजबुजणारे दाट धुके आणि जोडीला मस्त गारवा… पावसाळा संपतो न संपतो तोच पठारांवर, डोंगरउतारांवर बहरतो नयनमनोहर पुष्पोत्सव… अनेकविध रंग, रूप, आकार घेऊन भेटीला आलेली मनाला वेड लावणारी त्यातली इवलाली नाजूक रानफुले… त्यांचा तो भारून टाकणारा गंध…
निसर्गाच्या या अभिजात सौंदर्याबरोबरच या भूमीला वैभवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. बेळगाव व महारष्ट्राच्या कुशीत आजही मोठ्या दिमाखाने उभे असलेले गड-किल्ले… वास्तूवैभव आणि शिल्पकलेने नटलेली प्राचीनतम मंदिरे याचीच साक्ष देतात. निसर्गासोबत राहणारे येथील गडकरी, त्यांचे लोकजीवन, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा…आधुनिक तीर्थक्षेत्रे म्हणून गणली जाणारी लहानमोठी धरणे, जलविद्युत, पवनऊर्जा यासारखे प्रकल्प येथील डोंगरद-यात, पठारांवर आकाराला आले आहेत. बेळगाव सीमाभागात दिसणारं हे सारं वैभव आमच्या हुक्केरी तालुक्यातही पाहायला मिळते. ..
बेळगाव सीमाभागच्या कुशीत मनमुराद भटकंती करताना जीवाला वेड लावणारं हे सौंदर्य डोळे भरून पाहिलं. अगदी जवळून अनुभवलं. कॅमे-यात टिपण्याचा प्रयत्न केला. हे सारं आणखीन कोणाला तरी सांगण्याच्या उर्मीतून ही वेबसाईट आकार घेते आहे. हि वेबसाईट बनविण्याचा मला मान मिळाला तसाच अपूर्व आणि अवर्णनीय आनंद ही साईट पाहताना आणि मग प्रत्यक्षात भटकंती करताना तुम्हालाही मिळेल, खचितच! हा सारा प्रपंच यासाठीच…