किल्ले वल्लभगड, (संकेश्वर,बेळगाव), छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला व ऐतिहासीक पार्श्वभूमी लाभलेला वल्लभगडचा इतिहास. प्राचीन काळापासून भारतीय इतिहासाचे अवलोकन केल्यास या विशाल देशात अनेक राजसत्ता उदयाला येऊन आपल्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कायमचा ठसा उमटवून गेल्याचे दिसुन येते. या राजसत्ता टिकवुन ठेवण्यासाठी किल्ले, गडकोट, दुर्ग यांचा सिंहाचा वाटा आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा भागातील महाराष्ट्र सीमालगतच्या बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर जवळील वल्लभगड त्याचेच एक प्रतिक आहे.
राजकीय सत्तेच्या संरक्षणासाठी या किल्ल्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. हे किल्ले, गड, दुर्ग भारतभर विखुरलेले दिसतात. संकेश्वर जवळील वल्लभगड हा अतिप्राचीन गडांपैकी एक आहे. या किल्ल्याचा उपयोग छ्त्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी करुन घेतला होता. छ्त्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याकडुन पोर्तुगीजांकडे व कोकणातील जंजिऱ्याचे हबशांच्या फौजावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकण व गोवा सरहद्दीजवळ असणार्या अनेक किल्ल्यांचा खुबीने उपयोग करुन घेतला होता. चंदगड तालुक्यात असणारा कलानंदीगड व महिपाळगड,पारगड ,बेळगांव तालुक्यातील राजहंसगड, खानापुर तालुक्यातील भीमगड, गडहिंग्लज तालुक्यातील सामनगड, संकेश्वर जवळील वल्लभगड, आणि सौंदती तालुक्यातील पारसगड या आठ गडांचा उपयोग छ्त्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी करुन घेतला होता. या प्रत्येक गडावरुन दुसरा गड द्रुष्टीपथात येत असल्याने एका गडावरुन दुसर्या गडावर सांकेतीकपणे संदेश देणे सहज शक्य होत असे.
ऎतिहासीक पार्श्वभुमी लाभलेल्या या वल्लभगडाला त्याकाळात अत्यंत महत्व होते. दख्खनवर स्वरी करण्यास शिवाजी महाराज ज्यावेळी येथुन गेले. त्यांच्या क्रुष्णाघोडीच्या पावुल खुणा आज त्या आठवणींना उजाळा देतात.गडाच्या पायथ्यापासुन किल्यापर्यंतचे अंतर १ कि.मी. असून हा किल्ला सुमारे १८५० फुट उंचीचवर आहे. कोल्हापूर जिल्हयातील इतर गडांप्रमाणेच वल्लभगड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. सन १६५९ मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला. या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुखीचा उलेख सापडला नसला तरी या गडावर ७५ सिलेदार होते.व त्यांचे वंशज वल्लभगडावर आजही आहेत. साताऱ्याचे छत्रपती शाहू महराज यांनी या वल्लभगडाचे पुनर्बांधणी केली आहे . सन १६८८ मध्ये वल्लभगड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१ मध्ये हा गड पुन्हा मराठयांकडे आला. या नंतर सदाशिवराव भाऊ पेशवे करवीरकर छत्रपतींच्या सेवेत रुजू झाल्यावर 1751 ला भाऊसाहेबांचे सहकारी येसाजीपंत यांनी वल्लभगड ठाणे हस्तगत केल्याने चिकोडीकरांचे अवसान गेल्याचे पुरावे इतिहासात नोंद आहे. या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. त्यानंतर १४ मे १७५३ रोजी करवीरकर छत्रपती संभाजी राज्यांनी सदाशिवराव भाऊ पेशवे यांना वल्लभगड, भीमगड,पारगड व कलानिधीगड हे किले जहागीर दिले, त्यानंतर हा गड काही काळ निपाणीकर तर काही काळ पटवर्धनांच्या, तर काही वंटमुरी देसाई यांच्या ताब्यात गेला पण कोल्हापूर हे करवीर संस्थान संपुर्ण ईंग्रजांच्या ताब्यात गेले असता त्यावेळी हा गड १८४४ मध्ये वल्लभगड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
वल्लभगड (Vallabhgad) किल्ल्याची ऊंची : 3004 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही जिल्हा : बेळगाव श्रेणी : मध्यम कोल्हापूर – बेळगाव महामार्गावर संकेश्वरच्या आदी ३ किमी वर ‘वल्लभगड’ नावाचा एक फाटा आहे. या फाट्यावरून वल्लभगडाचे दर्शन होते. महामार्गापासून डावीकडे वळल्यावर आपण थेट वल्लभगड गावातच पोहोचतो. वल्लभग गावातून पंधरा मिनिटांत गडावर जाता येते.
पहाण्याची ठिकाणे : गडाच्या बुरुजाच्या बाजूला गावदेवी मरगुबाईचे पुरातन मंदिर आहे. मंदिरासमोर दिपमाळ आहे. मुख्य प्रवेशद्वाराची कमान उत्तम स्थितीत आहे. प्रवेशद्वार छोटे परंतु गोमुखी बांधणीचे आहे. प्रवेशद्वाराच्या आत मारुतीचे प्रशस्त मंदिर लागते. गडाच्या पूर्व तटावर सिध्देश्वराचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या खाली मोठी गुहा आहे. तिच्यात पादुका स्थापित केलेल्या आहेत. या गुहेतून एक भुयार आरपार गेले असून ते संकेश्वरात उघडते असे म्हणतात. गडाच्या मध्यभागी चौकोनी आकाराची खोल विहिर आहे. या विहिरीत उतरण्यासाठी मारुती मंदिराच्या मागून भुयारी वाट आहे. वीस-पंचवीस पायर्य़ा उतरल्यानंतर एक कमान लागते. पायर्य़ांचा मार्ग अत्यंत भव्य आहे. आणखी पुढे गेल्यावर मोठी विहिर लागते. गडाची बरीच तटबंदी उध्वस्त झालेली आहे. गडाच्या उत्तरेला एक बुरुज असून तो तटबंदीच्या आत सुटा उभारलेला आहे. यावरुन गडावरील अंतर्भागात लक्ष ठेवले जायचे. गड लहान व आटोपशीर असला तरी सध्या महाराष्ट्राच्या बाहेर असलेला शिवकालीन किल्ला म्हणून याचे महत्व फार आहे.
पोहोचण्याच्या वाटा : कोल्हापूर – बेळगाव महामार्गावर संकेश्वरच्या आदी नंतर ३ किमी वर ‘वल्लभगड’ नावाचा एक फाटा आहे. या फाट्यावरून वल्लभगडाचे दर्शन होते. महामार्गापासून डावीकडे वळल्यावर आपण थेट वल्लभगड गावातच पोहोचतो. वल्लभगड गावातून पंधरा मिनिटांत गडावर जाता येते.
– राहाण्याची सोय : किल्ल्यावर रहाण्याची सोय नाही.
– जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
– पाण्याची सोय : गडावर पाण्याचा तुटवडा आहे. गडाच्या अर्ध्या चढणीवर असलेल्या वाडीतून गडावर पाणी नेले जाते.
– जाण्यासाठी लागणारा वेळ : गडावर जाण्यासाठी १५ मिनिटे लागतात. गड पाहाण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे १ तास.
गडावर पाहण्याचे ठिकाण
१) गडदेवी मरगुबाई मंदिर
२) शिवकालीन हनुमान मंदिर
३) महादेव मंदिर
४) सिद्देश्वर गुफा
५) शिवकालीन विहीर
६) वल्लभगडच्या पूर्वेला हरिद्रादेवी मंदिर
टिप : दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे वल्लभगडावर दुर्गसंवर्धन मोहिमा राबविल्या जातात.
आपण पहात आहात वल्लभगडच्या शेतीविषयी माहिती
शेतीः गावातील प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेतीला प्रामुख्याने पाणी प्रत्येकाने स्वत:च्या शेतामध्ये विहीर खोदुन आणि बोरवेल द्वारे सोय केलेली आहे.
या गावात पठार आणि डोंगराळ भाग आसल्या कारणाने या गावची ७५ टक्के शेती पावसावर अवलंबून आहे त्यामुळे एकीकडे पाण्याची टंचाइ आणि दुसरीकडे दुष्काळ ही परिस्थिती निर्माण झालेली आहे.
शेतीत तंबाखु,मिरची,बेहमुग शेंग,सोयाबिन,कडधान्य,बाजरी, ज्वारी, बटाटे, कांदे, ऊस, पालेभाज्या ही प्रमुख पिके घेतली जातात.
शेतीमाल: संकेश्वर येथील हिरा साखर कारखाना आणि गडहिंग्लज जवळचा हरळी साखर कारखाना, निपाणी जवळचा साखर कारखाना या साखर कारखान्यांना ऊस पाठविला जातो
निपाणीचा तबांखु कारखाना येथे तबांखु पाठविला जातो इतर शेतीमाल संकेश्वर व निपाणीला पाठविला जातो.
जमिनीबद्दल माहितीः गावात बागायत आणि जिरायत दोन्ही प्रकारच्या जमिनी आहेत. गावच्या दक्षिणेकडच्या भागात सुपीक, काळी कसदार जमिन आहे. तर, गावच्या पुर्व बाजूस काही प्रमाणात हलक्या प्रतिची जमीन पहावयास मिळते.
गावात एकूण जमिनः १ हजार ०७४ हेक्टर क्षेत्र
लागवडीखालील जमीनः १ हजार २१२ हेक्टर क्षेत्र
पडीक जमीनः ४९२ हेक्टर
गायरान जमीनः ३० हेक्टर
गावठान जमीनः १५ हेक्टर
नद्या नाले, तलाव: वल्लभगडामध्ये एक पाजर तलाव गावच्या दक्षिणेच्या बाजुस आहे.
बेळगावमध्ये (वेनुग्राम) आपले सहर्ष स्वागत
मिरजेकडून बेळगावला येताना रेल्वे सांबऱ्याहून निघाली की पुढे जेमतेम पंधरा मिनिटांचा प्रवास उरतो. आपलं गाव जवळ आल्याची एकएक खूण दिसू लागते. मग एकदम भुइकोट किल्ला दिसू लागतो. म्हणजे बॅगा उचलून थेट दाराशी यायचं. दोन रेल्वे फाटकं ओलांडली की, बेळगाव आलंच.
प्रत्येक वेळी हा भुइकोट किल्ला दिसला की, मी मनात म्हणत असे, एकदा इथं यायला हवं. किल्ल्याच्या भोवतीचा खंदक चाळीसएक फूट रुंदीचा. एकेकाळी तो पंचवीस तीस फूट खोल, पाण्यानं भरलेला असे. आता प्रत्येक पावसाळ्यात होरून होरून तो भरत आलाय. दिवाळीनंतर तो कोरडा पडत जातो. एकदा बाळासाहेब दांडेकर अचानक सकाळी आले आणि म्हणाले , ‘ चला, आज आत्ता आपण किल्ला पाहायचा. कमलबस्ती पाहायची. ‘
या भागात चालुक्य आणि राष्ट्रकूट यांच्या राजवटीत ही जैनांची कमलबस्ती बांधली गेली. बस्ती आणि एकशे आठ मंदिरे. हळेबीड आणि बेलूरची शिल्पे उभवली जात होती, त्याकाळात बांधली गेलेली ही बस्ती अजून आहे. किल्ल्यात थोडकी वस्ती आहे. डांबरी रस्ते आहेत. काही सरकारी कार्यालये आहेत. 115 इन्फंट्री बटॅलियन महारचे ऑफिसही आहे. किल्ल्यासमोर खूप मोठा आरगन तलाव आहे. या तळ्यातला गाळ काढला, पाणी स्वच्छ केलं, तर यात नौकाविहारही करता येईल. पाण्याचे हजार उपयोग असतात. ते होतीलच. पण बेळगावच्या सौंदर्यस्थळांत आणखी एकाची भर पडेल.
नोकरीनिमित्त 1962 मध्ये मी बेळगावला आलो, तेव्हा ते आटोपशीर होतं. लाखाच्या आतबाहेर वस्ती. बेळगाव-जुनं, बेळगाव- शहापूर – टिळकवाडी- अनगोळ असे त्यात तेव्हा उपविभाग असत. पाणीपुरवठा नुकता नुकता नळानं होऊ लागला होता. शिवाय जिवंत पाण्याच्या लहानमोठ्या असंख्य विहिरी होत्या. कोकणात विहिरींवर रहाट असतात. इकडं मात्र कप्पीचा म्हणजे गडगड्याचा उपयोग केला जाई. आज कावेरी कोल्ड्रिंक आहे, तिथं बारा गडगड्यांची प्रचंड विहीर होती. अशीच एक मोठी विहीर हिंदवाडीत होती, तीही बुजवली गेली आहे.
पूवीर् सारस्वतांच्या बड्या घरी आणि एकूणच रईस लोकांकडे पाणी भरण्याचे काम करणारे लोक असत. दिवसाकाठी दहादहा घरी हे पाणक्ये चाळीसचाळीस घागरी पाणी भरीत. नेसू राजापुरी तोटका पंचा, खांद्यावर फडके असा त्यांचा वेश असे. आठपंधरा दिशी उंच आवाजात ‘ बिंदगास् स् बावडी ‘ की असंच काही ओरडत कुणी यायचा. ‘ पाताळगड्डी ‘ नावाची अफलातून चीज त्याच्याकडं असायची. एक मोठी वर्तुळाकार कडी. तिला अडकविलेल्या हुकांसारख्या दहावीस आकडेवजा कड्या. असं काहीसं ते असे. त्यालालांब दोरी असे. विहिरीत पाताळगड्डी टाकून ‘ बिंदगा ‘ पकडून तो वर आणण्यचा हा व्यवसाय घरोघरी विहिरी असल्यानं बरा चालत असे. आता ते बिंदगेही फारसे कुठं दिसत नाहीत. बिंदगा म्हणजे घागर. लग्नात रुखवतात हे तांब्याचे बिंदगे आणि हंडे देण्याची प्रथा होती. या भागातल्या विहिरी खूप खोल. म्हणून आत पडलेले बिंदगे काढून देणारे लोक हवे असत. विहिरींवरून आठवलं. टिळकवाडीत पहिल्या रेल्वे गेटापासून दोनशे पन्नास पावलांवर ‘ काँग्रेस विहिर ‘ आहे. पूवीर् ही ऐसपैस होती. नीट बांधलेली नव्हती. पोहायची उत्तम सोय म्हणजे काँग्रेस विहीर. अर्थातच अधूनमधून एखादी दु:खद घटना व्हायची. तशी ती घडली, म्हणजे लोक म्हणत , ‘ चला या वषीर्चा बळी घेऊन झाला. आता पोहायला हरकत नाही…’ काँग्रेस विहीर दरवषीर् एक बळी घेते, हा लोकभ्रम झाला होता. यंदा ही विहीर नव्यानं बांधून काढली आहे. तिला बिलगून एक छोटी बाग उठवल्येय.
आपण पहात आहात वल्लभगडच्या सणाविषयी माहिती
सणाविषयी माहिती: गावामध्ये साजरे होणारे सण
गुढी पाडवा: आपल्या देशात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी हिंदुसमाजाच्या नविन (नुतन) वर्षाला गुढीपाढव्यापासुन सुरवात होते. चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. तो प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
राम नवमी: चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी असे म्हटले जाते. या दिवशी कौसल्येने भगवान श्रीरामाला जन्म दिला होता. भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा…..
बेंदुर. बैलांचा सण: भारत हा शेतकर्यांचा देश असल्याने हा एक राष्ट्रीय सण – मुक्या प्रान्यांसाठी मानसासारख्या जनावरानं साजरा केलेला एकुलता एक सण आहे. पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलांच्या आदी उठतात. बैलांना नदीवर किंव्हा वड्यावर नेऊन निरमा लाऊन नाहु घालतात. शिंगे तासली जातात. नाकात नवी येसण आणि गळ्यात नवा कासरा लावतात. पायची खुरं कापुन पत्री मारत्यात.
पोळा म्हटल कि लहानपणच्या आठवणी डोळ्यापुढे येतात. गावाकडचे ते दिवस. शेतकरी पोळ्याची तयारी आधी पासूनच करून ठेवातात. पोळ्याच्या दिवशी सकाळी, बैलांना अंघोळ घालणे, सजवणे, रंगवणे हेच काम असाते. बैल सुद्धा प्रेमाने त्याला साथ देतात. घराघरात गोड पदार्थ तयार करतात. घरो घरी बैलांना घेऊन जातात.प्रत्येक घरी त्यांची पूजा करतात, नैव्येद्य दाखवतात. जिकडे तिकडे आनंद पसरलेला दिसतो.मातीची बैल जोडी बनवुन देवार्यावर त्याची सुद्धा पूजा केली जाते. लहान मुले मातीची बैल जोडी बनवीतात व ते सुद्धा आनंद लुटतात, पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
नाग पंचमी: गावातील लोक आपल्या घरात नागाचे पुजन करुन त्याला दुध पाजतात. वल्लभगडातुन दुसर्या गावात लग्न करुन गेलेल्या सर्व मुली या सणाल आवर्जुन माहेरी येतात व सर्व लहान थोर मंडळी एकत्र येउन झाडाला झोका बांदुन झोका घेऊन पुर्ण दिवस आंनदाने हा सण साजरा करतात.
नारळी पौणिमा-रक्षाबंधन: भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो.
रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमी-गोपाळकाला: या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणुन या दिवशी रात्री १२ वजता गावतील सर्व महिला मंडळी येकत्र येउन पाळणा बांदुन, त्यापाळण्यामध्ये श्रीकृष्णाची मुर्ती ठेउन त्याची पुजाकरुन पाळणा म्हणतात.दुस दहिहांडी (दहिकाला) या दिवशी लहान मुले व पुरुष मंडळी दोरीला बांदलेली दही हांडी फोडतात पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
गणेश चतुर्थी: भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची मृत्तिकेची प्रतिमा पूजावी. या देवतेला दूर्वा व मोदक फार प्रिय असल्यामुळे ते समर्पण करावे. शक्य त्यानुसार नवविद्या भक्तीच्या प्रकारांनी त्याला संतुष्ट करावे. गणपतीचे विसर्जन दीड, पाच, सात, दहा किंवा एकवीस दिवसांनी करावे. विसर्जन होईपर्यंत उत्सव चालू ठेवावा. उत्तरपूजेनंतर प्रतिमा जलांत विसर्जन करावी. असा हा वार्षिक गणपतिपूजेचा शास्त्रोक्त विधी आहे. पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा….
दसरा -नवरात्रौत्सव: आदिशक्तिच्या आराधनेचे पर्व म्हणून नवरात्रौत्सव साजरा केला जातो. शक्ती विना शिव हे शवासमान आहे, असे म्हटले जाते. शक्तीमुळेच तर संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे. शक्ती आराधना करण्यासाठी नऊ दिवसांचा काळ अर्थात नवरात्र अत्यंत महत्वपूर्ण आहे. नवरात्रात ब्रह्मांडातील सर्व शक्ती जागृत होतात. याच शक्तीने दैत्यांचा संहार केला आहे. नवरात्रौत्सवासंदर्भात भारतातील प्रत्येक राज्यात विविधता दिसून येते. नवरात्रात आदिशक्तिच्या नऊ अवतारांची तिथीनुसार पूजा अर्चा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी व सिद्धिदात्री, अशी देवीची नऊ रूपे आहेत. पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा….
दिवाळी: दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची उपासना अत्यंत श्रेष्ठ मानली गेली आहे. घराघरांत लक्ष्मीची पूजा-अर्चना केली जाते. लक्ष्मी ही विष्णू पत्नी आहे. ‘शतपथ ब्राह्मण’ ग्रंथात लक्ष्मीची एक कथा आहे. त्यानुसार प्रजापती हा लक्ष्मीचा पिता. लक्ष्मीचा जन्म अतिशय सुंदर आणि गुणवान देवीच्या रूपात झाला आहे.
भाऊबीज: कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन केले जाते. या पूजेला ‘यम द्वितीया’ असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळावे यासाठी पूजा करते. पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
मकर संक्रात: भारतीय संस्कृतीत सणांना अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. तिळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकर संक्रांत. हा सण खरोखरच भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहींना ह्या दिवशी तिळगुळ देऊन ‘तिळगुळ घ्या, गोडगोड बोला’ असे म्हणून एमकेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जात असते. सूर्याने एका राशीतून दुसर्या राशीत जाणे म्हणजे ‘संक्रमण करणे’. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यामुळे या सणाला ‘मकरसंक्रांत’ असे म्हणतात. या दिवशी सूर्य पृथ्वीची परिक्रमा करण्याची दिशा बदलवतो. म्हणजेच सूर्य थोडा उत्तरेकडे झुकतो. यामुळे या वेळेला उत्तरायण असेही संबोधतात. सूर्याच्या संक्रमणासोबतच जीवनाचे संक्रमण जोडले आहे. यामुळे या उत्सवाला सांस्कृतिक दृष्टीनेही महत्त्व आहे. पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा….
महाशिवरात्री: महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील सर्व बांधव गावात आसलेले शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतात.पार्वतीला शिव म्हणाले, ”यापुढे लक्षात ठेव. पृथ्वीवर आपसूक फुलं पडली ती आपली. झाडावर असलेली ती अरण्याची.” शिवाने पार्वतीला बेलफळ दिले. उमा बेलफळासह शिवात गुंगली. या कथेने पर्यावरणाचा संदेश दिला असून झाडांवरली फुले, फांद्या ताणून धसमुसळेपणे तोडायची नाहीत. महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील स्त्रिया डोक्यात फुले खोवत नाहीत. मोकळ्या केसांनी शिवदर्शनास त्या जातात. पांढरी फुले-बेल शिवाला वाहातात. शिव हा त्यांना आपला पालक वाटतो. संरक्षक वाटतो. काही आजुबाजुच्या गावचे लोक येऊन शिवांचे दर्शन घेतात. जत्रेत मुलांना डमरू घेतात. कडेवर पोरांना घेऊन फेर धरून देवाची गाणी गातात. पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा….
होळी: फाल्गून शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आठ दिवस होलाष्टक साजरे केले जाते. त्यासोबतच होळी उत्सव साजरा करण्याची सुरूवात होते. होळीची तयारी देखील तेव्हापासूनच सुरू होते. होळीच्या पूजनानंतर होळी दहन केले जाते. दहनानंतर गव्हाच्या ओंब्या त्यात भाजल्या जातात. हा सण नवीन पिकाच्या आनंदातही साजरा केला जातो.
होळी दहनानंतर जी राख उरते. तिला भस्म म्हटले जाते. ते शरीरावर लावायला हवे. होळीची गरम राख घरात समृध्दी आणते असे मानले जाते. असे केल्याने घरात शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते होळीच्या दुसर्या दिवशी धुलीवंदन शहरी भागात याच दिवशी रंग खेळला जातो खेडे गावात मात्र होळीच्या पाचव्या दिवशी रंग खेळला जतो. पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा….
हरगापूर गड-(वल्लभगड) ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
हरगापूर गड-(वल्लभगड) ग्रामपंचायत ही हरगापूर आणि वल्लभगड या दोन गावांची सामुहिक ग्रामपंचायत आहे.
या ग्रामपंचायतीचे एकुन ९ सद्स्य असुन हरगापुरचे ३ तर वल्लभगडचे ६ सदस्य आहेत. या ग्रामपंचायतीची निवडनुक प्रत्येक ५ वर्षाने होते. या ग्रामपंचायतीद्वारे घरकुल योजना तसेच जल योजना, नळ योजना रस्ते विकास, अशा अनेक योजना रबविल्या आहेत, व अनेक योजना रबविल्या जाणार आहेत.
सरपंचः श्री.संदिप पाटील-हरगापूर
उपसरपंचः सौ.सैलेजा शिवमुर्ती खनदाळे-हरगापूर
ग्रामसेवकः
तलाठी:
ग्रामपंचायत सदस्य:
१) श्री.आनंद तुकाराम शेंडे
२) श्री.सुनिल राजाराम शेलार
३) सौ.बसवा महादेव नाईक
४) सौ.बसवा कल्लाप्पा कांबळे
५) सौ.आरुणा भिमराव भोसले
६) सौ. शांता रायाप्पा होनुगरे
७) श्री.बिराप्पा लक्ष्मण होनुगरे
वल्लभगडच्या स्थानिक संस्थेविषयी माहिती
सहकारीः
गावात सहकारी संस्था असून त्यामार्फत शेतकरर्यांना पिक
कर्जाचे कमी व्याजदराने वाटप केले जाते. दरवर्षी शेतकरर्यांना कर्जाचे वाटप केले जाते.
दुग्ध डेअरी
दुग्ध संकलन करणारी गावात गोकुळ,शेंडे दूध उत्पादक संस्था ह्या डेअरी आहेत. त्याचप्रमाणे वस्तीवस्तीवर छोट्या डेअरी आहेत.
गावात शेतीबरोबर दूध व्यवसाय हा जोडधंदा केला जातो. त्यामुळे वस्तीवस्तीवर दूध संकलन करण्यासाठी डेअरी आहेत.
८ दिवसाला दूधाचे पगार होत असल्यामुळे शेतकरी या व्यवसायकडे बहुसंख्येने वळाले आहेत. सशिक्षित बेरोजगार तरूणांनी दूध व्यवसाय हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन केले आहे. गावात प्रत्येक घरात दोन ते तिन म्हशी असून, बैल देखील आहेत त्यांच्या प्रामुख्याने शेतीच्या कामासाठी उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे काही शेतकर्यांकडे बैलगाडयाही आहेत. एक हजार शेळ्या, आणि १ हजार म्हशी आहेत. गावात व्यावसायिक दृश्टीकोनातून वराहपालन केले जात आहे.
युवक मंडळ व महिला मंडळ
शिध्देश्वर युवक मंडळ , हनुमान तरुण मंडळ, आदर्श युवक मंडळ, शिवाजी तरुण मंडळ, बाल शिवाजी मंडळ, श्रीराम तरुण मंडळ, ९६ मराठा मंडळ व अनेक युवक मंडळे तसेच महिला मंडळ आहेत.
वल्लभगड हे आदर्श गाव
आदर्श गाव: वल्लभगड या गावाला आदर्श गाव पुरसकार मिळाला नसलातरी या गावात ग्राम स्वछता अभियान राबवलेले नसले तरी हे गाव स्वछ व अतिसुंदर आहे. आदर्श गाव म्हणजे काय? येथे क्लीक करा आणि जानुन घ्या
वल्लभगड गावचे रस्ते विकास सुविधा
रस्ते विकास सुविधा : वल्लभगड गावाला जाणारे दोन मुख्य रस्ते आहेत. पेठ विभाग आणि दुसरा वाडी विभागाकडे ह्या दोन रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. गाव आणि वस्त्यांना जोडण्यासाठी खडी आणि मुरम्याचे रस्ते तयार करुन डांबरीकरण करण्यात आले आहेत. खालचा शिवार, पठार, चव्हाण मळा, सळूंखे मळा, पाटील मळा, तांबोळी, कंटी येथे जाण्यासाठी चांगल्या प्रकारचे रस्ते आहेत. त्याचप्रमाणे पाण्याची निचरा होण्यासाठी रस्त्याच्या बाजुने गटारींची सोय केली आहे. तसेच गावातील सर्व गलींमध्ये रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे.तसेच काही गलींमध्ये रस्त्यांचे रुंदीकरन करुन डांबरीकरण व गटारी सिमेंटने बांदुन घेतल्या आहेत.
हरगापूर गड (वल्लभगड) प्राथमिक मराठी मुलांची शाळा
हरगापूर गड (वल्लभगड) प्राथमिक मराठी मुलांची शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
वल्लभगड येथे प्राथमिक मराठी मुलांची शाळा आहे या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत येथे मराठी व कन्नड दोन्ही माध्यम आहेत. या शाळेतील विध्यार्थी सातवीनंतरचे शिक्षण एस.डी हायस्कुल संकेश्वर येथे घेतात. बेळगाव जिल्ह्यामध्ये सर्व ठीकाणी कर्नाटक सरकारने मराठी भाषीकांना कन्नड विषय सक्तीचा केला आहे.
तसेच हरगापूर गड (वल्लभगड) प्राथमिक मराठी मुलांची शाळेच्या समोर मोरारजी देसाई महाविद्यालय व बोर्डींग आहे. गावामध्ये दोन अंगणवाडी आहेत. या शाळेमध्ये व अंगवाडीमध्ये सर्व मुलांना एकवेळ भोजन देतात.
शाळेचे नाव:वल्लभगड प्राथमिक मराठी मुलांची शाळा
मुख्याध्यापक:
शिक्षक:
वल्लभगडची दळणवळण सुविधा
दळणवळण:वल्लभगड गाव हुक्केरी तालुक्यामध्ये असुन हे गाव संकेश्वर पासुन ४ कि.मी आंतरावर आहे. या गावाला जाण्यासाठी संकेश्वर बस स्थानकामधुन सकाळी, दुपारी व सायंकाळी के.एस.आर.टी.सी च्या बसेस आहेत.या बसेस वल्लभगडहुन हरगापूर गावाला जातात तिथुन या बसेस परत वल्लभगडहुन संकेश्वरला जातात तसेच निपाणी, बुगटे आलुर, सोलापूरला जाणार्या बसेसमधुन प्रवास केला तर सोलापुर गेट (वल्लभगड गेट) येथे उतरुन १ कि.मि पायी चालत वल्लभगडला जावे लागते तसेच या गावाला जाण्यासाठी संकेश्वरमधुन खाजगी (वडाप) गाड्याही आहेत.
के.एस.आर.टी.सी गाड्यांचा वेळापत्रक
संकेश्वरहुन गाडी | वल्लभगडला पोहचण्याची वेळ | वापस संकेश्वरमध्ये पोचण्याची वेळ |
सकाळी ९.वाजता | ९.१५ | ९.३० |
दुपारी २.वाजता | २.१५ | २.३० |
सायंकाळी ६. वाजता | ६.१५ | ६.३० |
वल्लभगड गावच्या पाण्याच्या सुविधेची माहिती
पाण्याच्या सुविधा: वल्लभगड गावच्या दक्षीनेच्या दिसेला १ कि.मि अंतरावर सरकारी विहीर आहे या विहीरीचे पाणी गावच्या पायथ्याशी पाणी साठवण्यासाठी मोठी टाकी बांधलेली आहे. त्या टाकीमध्ये पाणी सोडले जाते नंतर ते पाणी किल्याच्या तटाच्या खलच्याबाजुस म्हणजे २०० फ़ुट वर टाकी आहे त्या टाकीमधे साठवले जाते नंतर ते पाणी गावातल्या नळाद्वारे सोडले जाते.तसेच गावामध्ये किल्ल्याच्या सभोवती गाव वसलेले आहे. गावामध्ये चार मोठया वाड्या आहेत, पेठ विभाग, वाडी विभाग, चिंचाळी, व हरीजन वाडा या चारी वाड्यांमध्ये नळाद्वारे पाणी पुरविले आहे. व प्रत्येक ठिकाणी बोरवेल व छोटे जलकुंभ देखील आहेत.उन्हाळ्याच्या वेळी मात्र विहीरीला व बोरवेलला पाणी कमी होते त्यावेळी मात्र लोकांची मोठी पंचायत होते.
हे गाव उंचावर असल्यामुळे जवळपास नदी किंवा कोणतेही धरण नाही म्हणुन या गावाला बारामहीने पिण्याच्या पण्याची सोय करने गरजेचे आहे. कर्नाटक सरकार व बेळगाव जिल्हाधिकारी तसेच स्थानिक नेत्यांनी या गावकडे लक्ष देऊन कायमस्वरुपी पिण्याच्या पण्याची सोय करावी.
वल्लभगडमध्ये होणारे यात्रा महोत्सव
मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
यात्रा महोत्सव:
गावाचे ग्रामदैवत
श्री. मरगुबाई
गावातील मंदीरे: श्री.मरगुबाई मंदिर, सिध्देश्वर मंदिर, बसवेश्वर मंदिर,थोळोबा मंदिर,रामलींग मंदिर, हरिद्रादेवी मंदिर,लक्ष्मी मंदिर,गणेश मंदिर,हनुमान मंदिर,सिद्राया मंदिर,राम मंदिर,
मरगुबाई देवीची माहिती
गावचे ग्रामदैवत , श्री. मरगुबाई या देविची यात्रा प्रत्येक वर्षी मे महिन्यात नृसिंह जयंती नंतर येणार्या पुढील मंगळवारी भरते. या यात्रेसाठी कर्नाटक व महाराष्ट्रातून लाखो भाविक येतात व भक्तीने दर्षन घेवून जातात. आधिक महितीसाठी येथे क्लिक करा….